Nagar Crime News | कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरून विल्हेवाट लावणाऱ्या दोन भंगार दुकान चालकांसह चौघांना कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अहमद मुन्ना शेख रा. मुकुंदनगर, अहमदनगर) शाहरुख आलम शेख रा. (नागरदेवळे ता. नगर जि. अहमदनगर अशी चोरट्यांची नावे आहेत तर जावेद रऊफ शेख रा सादिकमळा भिंगार अहमदनगर), राम विलास ससाणे रा. गजराजनगर, अहमदनगर) असे भंगार दुकान चालकांची नावे आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारीला मनिष मदनलाल फुलढाळे (वय ५२, रा. महाविर अपार्टमेंट, ख्रिस्तगल्ली अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात राहत्या घरासमोरून बुलेट चोरीला गेल्याबाबत तक्रार दिली होती.
सदर घटनेचा कोतवाली पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदर गुन्हयातील चोरीस गेलेली बुलेट मोटारसायकल ही अहमद शेख याने चोरी केली असुन त्याने चोरी केल्यानंतर सदरची बुलेट ही त्याचा साथीदार शाहरुख शेख याचे राहते घरात लपवुन ठेवली होती.
त्यानंतर कोठेतरी घेवुन जावुन ती खोलून तीचे सर्व वेगवेगळे स्पेअरपार्ट सुटटे करुन भंगारच्या दुकानामध्ये विक्री करुन त्याची विल्हेवाट लावलेली आहे. व मिळालेल्या पैशाची दारु पिवुन मौजमजा केलेली आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार अहमद शेख व शाहरुख शेख यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची बुलेट ही आम्ही चोरुन करुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट वेगवेगळे करुन ते भंगार विक्रेते जावेद शेख व राम यांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्या चौघांनाहि पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींना दोन दिवस तर मोटरसायकल खोलून विल्हेवाट लावणाऱ्या भंगार दुकानदारांना एक दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. अटक आरोपींना अधिक विचारपूस सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, योगेश खामकर, बाळासाहेब मासळकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ आदिंच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..