पुणे – Motor Thief : खराडी बायपासवरील भागातून मोटार चोरून (Motor Thief) पसार झालेल्या एकाला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Motor Thief) याबाबत एकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Motor Thief)
रामेश्वर अर्जुन मिस्कीन (वय २६, रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी बायपासभागातील सिग्नल दुरुस्तीचे काम तक्रारदाराच्या कंपनीकडे देण्यात आले होते. तक्रारदार आणि चार कामगार मोटारीतून तेथे आले होते. खराडी बायपास भागात त्यांनी मोटार लावली होती. रात्री बाराच्या सुमारास सिग्नल दुरुस्तीचे काम करून ते आले. तेव्हा मोटार जागेवर नसल्याचे आढळून आले.
तक्रारदाराने मोटारीबाबत चौकशी केली. तेव्हा मोटार चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत तक्रारदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरलेली मोटार खराडी भागातील एका रुग्णालयाजवळ असलेल्या पडक्या इमारतीच्या परिसरात लावण्यात आल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे आणि प्रदीप घोडके यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच मोटार चोरटा मिस्कीन तेथून पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :