देहूरोड, (पुणे) : दोन सख्खे लहान भाऊ ( two younger brothers) बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना देहूगाव येथील विठ्ठलवाडी ( Vitthalwadi area of Dehugaon) परिसरात शनिवारी (ता. ६) सायंकाळी ६ वाजण्याच्या ( 6 o’clock in the evening) सुमारास उघडकीस आली आहे.
निखिल वर्मा (वय ८) व नितीन वर्मा (वय ६) अशी बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन भावंडांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मी राजकुमार वर्मा (वय-३०, धंदा नोकरी रा. विठ्ठलवाडी देहूगाव पुणे) यांनी मुले बेपत्ता झाल्याची देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (ता.७) तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तक्रारदार लक्ष्मी व त्यांचे पती राजकुमार वर्मा मुलांना घरी ठेऊन शनिवारी (ता.६) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामावर निघून गेले. तक्रारदार या सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आल्यावर त्यांना त्यांची दोन्ही मुले आढळून आली नाहीत.
तक्रारदार लक्ष्मी यांनी दोन्ही मुलांचा शोध देहूगाव, बस स्टॉप, मंदिर, शेजारी, नातेवाईक यांच्याकडे केला. मात्र दोन्ही मुले मिळून आली नाहीत. त्यांनतर तक्रारदार लक्ष्मी यांनी तातडीने देहूरोड पोलीस ठाण्यात गाठले. आणि दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
निखिलची उंची 4.5 फूट, बांधा-पातळ, रंग-गोरा, केस-बारीक काळे, अंगात पिवळ्या रंगाचे चौकडी शर्ट, त्यावर जॉय नेस्ट शाळेचा बॅच, निळ्या रंगाची फुलं पँट, पायात लाल रंगाची चप्पल व नितीनची उंची ४ फूट, बांधा-पातळ, रंग-गोरा, केस-बारीक, अंगात सफेद रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची हाफ पँट, पायात निळ्या रंगाची चप्पल अशा वर्णनाची दोन मुले बेपत्ता झाली आहे.
दरम्यान, या वर्णनाची मुले जर कोणाला आढळून आल्यास त्यांनी तातडीने 020-27671188 / 9823586190 / 9422939077 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क करावा. असे आवाहन देहूरोड पोलिसांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Health Tips | लहान मुलांना दुधासोबत ‘हे’ पदार्थ खायला देणे टाळावे