राजस्थान Crime : जुन्या काळी ऐन लग्नात हुंडा मागितला जायचा मग वधूकडील मंडळींची धावपळ व्हायची. (Crime) लग्न व्हावंच, वऱ्हाड तसंच माघारी जाऊ नये म्हणून वधूकडील मंडळी हुंड्याची जमवाजमव करायचे किंवा वेळ मागून घ्यायचे. (Crime) आता मात्र चित्र आणि काळ दोन्हीही बदलले आहेत. (Crime)
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात घडला प्रकार..!
हुंडा मागणारच पुढंपुढं केलं जात नाही तर धुलाई केली जात आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात घडला आहे. येथे ऐन लग्नात हुंडयासाठी असून बसणाऱ्या नवरदेवाला भर मंडपात नवरीकडील मंडळींनी चांगलाच चोप दिला, एवढंच नाही त्याला बांधूनही ठेवण्यात आलं.
१ मे रोजी नागलगावच्या लखन मीणा यांची मुलगी निशा (२४) हिचा विवाह दौसाच्या बेजुपाडा तालुक्यातील झुताहेडा स्थित विजेंद्र (२८) याच्याशी निश्चित झाला होता. दोन्ही गावं एकमेकांपासून केवळ ११ किमीच्या अंतरावर आहेत. सोमवारी रात्री ७ वाजता विजेंद्रच्या कुटुंबातील लोक वऱ्हाड घेऊन नागल गावात पोहोचले. रात्री ९ वाजता फेरे घेण्यात येणार होते.
दरम्यान, तत्पूर्वी मुलीकडच्या मंडळींना गावातून वरात काढण्याची सर्वच तयारी केली होती. त्यानुसार, नवरदेवाची वरातही निघाली. दरम्यान, रात्री ९ वाजता लग्नात फेरे होण्यापूर्वीच नवरेदवाने हुंड्यात पैशांसह बोलेरो गाडीची मागणी केली. तसेच,हुंडा मिळाला तरच आपण लग्नास तयार होणार, आणि फेरे घेणार, यासाठी असून राहिला.
नवरदेवाच्या अश्या वागण्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी नवरदेव विजेंद्र आणि त्याचे चुलते पप्पूलाल मणी यांची धुलाई केली. कपडेही फाडले. त्यामुळे, दोन्हीकडील लोकं आमने-सामने आले. लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. नवरदेव व नवरदेवाच्या काकांनी धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, मुलीच्या मंडळींनी दोघांनाही बांधून ठेवलं. अखेर, पोलिसांच्या मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला. याप्रकरणी विजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Crime : मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं ; एका कुत्र्याविरोधात पोलिसात तक्रार