राहुलकुमार अवचट
Yavat Crime यवत, (पुणे) : पिंपळगाव (ता. दौंड) येथील गुऱ्हाळ चालकाचा विश्वास संपादन करून ३ लाख ७० हजाराचा गुळ खरेदी करून पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुमोल कुमार हेमराज मित्तल व अनुकुल अनुमोल मित्तल (दोघे सध्या रा. बी १/४०३ लाईफ पार्क, सोसाईटी, महम्मदवाडी, पुणे मुळ रा. भरते कलोनी, ता. जि. मुज्जफानगर, राज्य उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत गुऱ्हाळ व्यावसायिक किशोर संपत शितोळे (रा. पिंपळगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
किशोर शितोळे यांचा पिंपळगाव हद्दीत गुऱ्हाळाचा व्यवसाय आहे. किशोर शितोळे यांचा वरील दोघांनी विश्वास संपादन करून ३ लाख ७२ हजार ४०० रुपये किमतीचा १५ टन गुळ खरेदी केला. यावेळी मित्तल यांनी २ लाख व रुपये १ लाख ७२ हजार ४०० असे दोन चेक दिले. परंतु दिलेल्या चेकची मुदत संपेपर्यत चेक बॅकेत भरू नका असे सांगितले.
दरम्यान, दिलेल्या चेकची मुदत संपली व पैसे मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शितोळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वरील दोघांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. सदर दोन्ही आरोपींवर यवत पोलीस ठाण्यात यापूर्वीहि ५ गुन्हे दाखल आहेत. याबाबत पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भोर हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल
Yavat | माणकोबा वाडा फाटा बनला ॲक्सिडेंट पॉइंट ; सिग्नल बसवण्याची ग्रामस्थांकडून मागणी