राहुलकुमार अवचट
Daund Crime यवत (पुणे) : देवकरवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत दोन गुऱ्हाळचालकांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्ष सुदाम देवकर व प्रकाश रावसो देवकर (ता. दोघेही, देवकरवाडी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत महावितरणचे कर्मचारी दिपक श्रीमंतराव कोथळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…!
दोघेही देवकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत राहत असून दोघांचीही स्वतंत्र गुऱ्हाळ आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती कि, वरील दोघेजण हे वीज चोरी करून वापरात आहेत. महावितरनच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गोरक्ष देवकर यांच्या गु-हाळवर वीज चोरी करून वापरीत असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी ते मे दरम्यान
महावितरण कंपनीचे ३ लाख ८४,३१० रुपयांचे २४ हजार १७५ युनिटचे बिल व तडजोड रक्कम २ लाख ४० हजारचे नुकसान केले आहे.
दरम्यान, प्रकाश देवकर यांनी त्यांच्या मालकीच्या गु-हाळाकरीता २ लाख ८ हजार ८७० रु. किमतीची वीज चोरून महावितरण कंपनीचे १२ हजार ७६३ युनिटचे व तडजोड रक्कम १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. त्याबाबत दिपक कोथळे यांनी वरील दोघांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund News : दौड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपने पाडले खिंडार , भाजप राष्ट्रवादीची फिफ्टी
Daund Crime : कानगाव येथे दोन घरफोड्या ; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास, परिसरात खळबळ..