Accident मंचर, (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणारा चाळीस फूट लांबीचा ट्रेलर रस्त्यातच पलटी झाल्याची घटना घडली आहे. भोरवाडी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. ०५) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तसेच दोन्ही बाजूने एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पुण्याहून नाशिककडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने भोरवाडीच्या पुलानजीक टेलर पलटी झाला. याबाबत मोठा आवाज झाल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी जाऊन पाहिले असता एक कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मंचर पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, शुक्रवारी बुद्धपोर्णिमा सुट्टीचा दिवस असल्यामुळे व लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने चार चाकी, लक्झरी, एसटी गाड्या व इतर वाहनांची गर्दी वाढली होती. याचा फटका अनेक प्रवाशांना बसला असून त्यामध्ये लहान मुले, जेष्ठ नागरिक व महिलांचे अतोनात हाल झाले.
सदर कंटेनर नेमका कधी बाहेर काढता येईल. याविषयी अजून निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. मंचर-घोडेगाव मार्गे पेठ तसेच अवसरी खुर्द, गावडेवाडी मार्गे राजगुरुनगर अशी पर्यायी मार्गाची निवड काही वाहनचालकांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन..