Pimpri Crime पिंपरी-चिंचवड : जमिनीच्या वादातून चौघांनी तरुणास लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड भागातून समोर आला आहे. एकत्र केलेल्या जमीन खरेदीच्या व्यवहारात पैसे देणे-घेण्यावरून वाद झाला होता. ही प्रकार रविवारी (दि.30) रात्री डुडुळगाव येथील साठेनगर परिसरात घडला.
याप्रकरणी दिगंबर बाळासाहेब काटे (वय 30 रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून असून विजय तारासिंग चव्हाण (वय 38 रा. डुडुळगाव), अर्जून मोतीराम राठोड, विनोद मोतीराम राठोड व करण दामू राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी यांनी २०२१ मध्ये एक निवासी प्लॉट खरेदी केला होता.हा प्लॉट फिर्यादी यांचा मयत मित्र रमेश तारासिंग चव्हाण व फिर्यादी यांनी मिळून घेतला होता. त्यानंतर मयत रमेश यांचा भाऊ विजय याने व्यवहारातील पैसे देवाण-घेवाणीचा वाद वाढवून चर्चे करिता फिर्यादीला बोलावले व फिर्यादीला इतर साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉड व लाकडाने मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.