Pune Crime खेड शिवापूर, (पुणे) : कचरा साफ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना खेड शिवापूर (ता. हवेली) येथे घडली आहे. शनिवारी (ता. २९) हि घटना कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्या शेजारी घडली आहे.
अंकुश परशुराम गुंजाळ (वय ६५) असे विजेचा धक्का बसून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
खेड शिवापूर येथील दर्ग्यावर हजारो भाविक येतात. आलेला प्रत्येक भाविक हा शेरा वहात असतो. शेऱ्यांनी ठराविक उंची गाठली की त्यावरील शेरे काढून शेजारील जागेत टाकले जातात. त्यामुळे त्याठिकाणी घाण पसरली होती. त्याण्य्सार अंकुश गुंजाळ हे कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्या शेजारी पडलेला कचरा साफ करीत होते.
सदर घाण टाकल्याने शेजारी असलेल्या विजेच्या खांबाजवळील तार तुटल्याने गुंजाळ यांना विजेचा धक्का लागून ही घटना घडली असल्याचे खेड शिवापूरचे सरपंच अमोल कोंडे व माजी सदस्य शाफिकभाई तांबोळी यांनी सांगितले. वक्फ बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा हा बळी असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला असून कचरा विघटन करण्यासाठी लवकरात लवकर जागा देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, भविष्यात याठिकाणी दुर्घटना घडू शकते हे नाकारता येत नाही त्यामुळे वक्फ बोर्डाने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी. यापुढे अशी दुर्घटना घडल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच अमोल कोंडे यांनी दिला. जागा देण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथे दिला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. येत्या पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेऊन जागा देण्याचे निश्चित होईल असे वक्फ बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी खुसरो खान यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पीएमपी बसमधील गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक ; 15 मोबाईल जप्त
Pune Crime :तू मला ओळखत नाही का, मी तळेगावचा भाई म्हणत तरुणाचा चायनिज सेंटरवर कोयता घेऊन गोंधळ