Maharashtra Din 2023 पिंपरी : महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान सारखा विधायक उपक्रम घेण्यात येत आहे. ही निश्चितच आदर्शवत बाब आहे, असे मत उद्योजक कार्तिक लांडगे यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाद्वारे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिघी मॅक्झिन सेवा केंद्रद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्तिक लांडगे बोलत होते.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक कार्तिक लांडगे, सचिन लांडगे, मुकेश लोंढे, कानिफनाथ मंदिर चर्होली अध्यक्ष अॅड जालिंदर जोरे, संतोष तापकीर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मनोज काळे, आनंद फुले, श्रीनिवास साखरे, शिवाजी पवार, रोहित तापकीर, अमोल शिंदे, अनिल शिंदे, आदी उपस्थित होते.
सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा
यावेळी कार्तिक लांडगे आणि अॅड. जालिंदर जोरे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल दिंडोरी प्रणित मार्गाचे आभार व्यक्त केले. या शिबिरामध्ये सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा केली. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीने सहकार्य केले.