युनुस तांबोळी
शिरूर Shirur News : मानवी जीवनात सन्मानाने जागायचे असल्यास सुसंस्कृत विचारमुल्ये जपणे गरजेचे आहे. हसतखेळत आयुष्याला वळण देताना अब्दूल रहेमान तांबोळी यांनी चतुर्थ श्रेणी पदासाठी योग्य सन्मान मिळवून देण्याचे काम केले. (Shirur News) त्यामुळे त्यांच्या सेवा पुर्ती समारंभाला ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी यांनी हजेरी लावली. असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व महात्मा गांधी विद्यालय मंचरचे प्राचार्य उत्तमराव आवारी यांनी केले. (Shirur News)
अब्दूल रहेमान तांबोळी यांचा सेवापुर्ती समारंभ
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील बालाजी मंगल कार्यालयात न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनीअर कॅालेजने रयत सेवक अब्दुल रेहमान शमशुद्दीन तांबोळी यांच्या रयत शिक्षण संस्थेतील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असताना ते बोलत होते.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, सुदाम इचके, बेल्हेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग, प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, दीपक रत्नपारखी, बबनराव पोकळे, रामदास सांडभोर, बाळासाहेब डांगे, संजय नाना चौधरी, सुधीर रोकडे, आर के मोमीन, अर्जून मुखेकर, रितेश शहा, बाजीराव उघडे, बबनराव पोकळे, मधुकर वाव्हळ, लहू मावळे, सकाळचे बातमीदार अन्वर मोमीन शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व तांबोळी यांचे नातेवाईक,आप्तेष्ट, मित्र परिवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता.
दरम्यान, प्रतिमा पूजन, स्वागत गीत, रयत गीत यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर प्रास्ताविक व मान्यवरांचा स्वागत सत्कार समारंभ तसेच सेवापुर्ती निमित्त ए एस तांबोळी यांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी केले. आरिफ मोमीन यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :