Accident | धायरी : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आखुर्द परिसरातील दरी पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी सात वाजता भऱधाव कारची टेम्पोला धडक बसली. यात शॉर्टसर्किट होऊन या कारने अचानक पेट घेतला. पेट घेतलेली मोटार व टेम्पो ही दोन्ही वाहने पुण्याकडून सातार्याकडे जात होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरी पूल परिसरातील गतिरोधकावर चालकाचे नियत्रंण सुटल्याने कारची पुढे चाललेल्या टेम्पोला धडक बसली. त्यानंतर शॉर्टसर्किट होऊन कारला आचनक आग लागली. आग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक व सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!