Pimpri Crime पिंपरी-चिंचवड : पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अवघ्या चार महिन्यापुर्वी लग्न झालेल्या नवविवाहीतेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना भोसरीतील गणराज कॉलनीमध्ये 4 एप्रिल 2023 रोजी घडली आहे.
याप्रकरणी विवाहितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.28) रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती शुभम प्रकाश खिस्ती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
आरोपी पती शुभम याच्याशी तक्रारदार यांच्या मुलीचा विवाह 2 डिसेंबर 2022 रोजी झाला होता. मात्र लग्नाला चार महिने होत नाही तोच आरोपी पतीने विवाहीतेला विविध कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. यातून त्याने पीडितेस मारहाण व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.