Baramati Crime | बारामती (पुणे ) : बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर गुरुवारी (२७ एप्रिल) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेत अचानक तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती आढळून आले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी संबधित जोडप्यांना समज देऊन सोडले.
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तालुका पोलिस ठाण्याचे प्रभाकर मोरे यांच्यासह महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांनी बारामती शहरातील विविध हॉटेल व लॉज तपासले.
बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील पोलिसांना सूचना केल्या होत्या. तसेच विविध लॉज हे बारामतीत चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याच्या संदर्भातील लोकांच्या तक्रारी पोलिसांच्या कानावर आल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार अचानक दुपारच्या वेळी शहर आणि एमआयडीसी परिसरातील काही लॉजची पोलिसांनी तपासणी केली.
दरम्यान, १५ ठिकाणच्या छाप्यात महाविद्यालयीन विद्यार्थी असलेली ११ जोडपी पोलिसांना या लॉजवर आढळून आली. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी समज देऊन सोडले, परंतु यापुढील काळात कोणतीही समज दिली जाणार नाही, लॉज मालकांवरही व व्यवस्थापकांवरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिला.
लॉजच्या इमारतीचे ऑडिट तपासणार…
दरम्यान शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉजवर प्रवेश दिला जात असेल, तर अशा लॉजमालकांवर कठोर कारवाई केली जाईल. बारामती नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने या अवैध कामे सुरू असलेल्या लॉजच्या इमारतीचे ऑडिट तसेच इतर तांत्रिक तपासणी देखील करून घेतली आहे की नाही हे देखील पाहिले जाणार आहे.
पालकांना सूचना देऊन कारवाई…
दरम्यान, ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असेल तर अशा लॉज मालकांवर, व्यवस्थापकावर व कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे भोईटे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना आता समज दिली असली, तरी या पुढील काळात त्यांच्या पालकांना देखील याची माहिती कळवून विद्यार्थ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचा इशारा भोईटे यांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati News : कालीचरण महाराजांनी बारामतीत केलेल्या ”त्या” वक्तव्याबाबत गुन्हा दाखल