Fraud पुणे : पुणेकर खाण्याच्या बाबतीत चांगलेच चोखंदळ आहेत. पुणे तिथं खायला काहीही उणे नाही असं म्हणता येईल इतके वेगवेगळे पर्याय शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठे काही चांगली ऑफर असेल तिचा फायदा करुन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र अशी ऑफर पाहणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर चोरट्याने महिलेला तब्बल २ लाख रुपयांना गंडा Fraud घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत शुक्रवार पेठेतील एका ३८ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, मुन्नर, केरळ)
व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जुलै २०२२ रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
सायबर चोरटे केरळचे असून त्यांनी पुण्यातील सुकांता येथील थाळी फ्री ऑफर देत होता. फिर्यादी यांच्या आईचे फेसबुकवर सुकांता थाळीची एका थाळीवर एक थाळी फ्री, अशी ऑफर असल्याचे जाहिरात आली होती. फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल नंबरवर फोन केला असताना त्यांनी बँक खात्याची माहिती घेऊन त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन १ लाख ९९ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव तपास करीत आहेत.