Pune Crime पुणे : भारतीय चलनातील वाटणार्या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगून बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून एकाला तब्बल ५ लाख ३४ हजार रुपयांना गंडा घातल्याच प्रकार समोर आला आहे. तसेच पैसे परत मागितल्यावर पिस्तुलातील गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार वानवडीतील एस आर पी एफ ग्रुपजवळ ३० मार्च ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला.
याबाबत खराडी येथे राहणार्या एका ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (रा. निलंगा, लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय चलनातील वाटणार्या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
रुपाली राऊत हिने आपण मंत्री असल्याचे व संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील वाटणार्या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना वानवडी येथे बोलावून घेतले. त्यांना ते कसे बनवायचे याचा डेमो दाखविला.
प्रत्यक्षात त्या खर्या नोटाच ते हातचलाखी करुन आपण केमिकलच्या सहाय्याने तयार करतो असे दाखविले. त्यासाठी त्यांच्या मोठ्या ओळखी आहेत. संजयकुमार पांडे हे उत्तर प्रदेशचे आमदार असल्याचे सांगितले.
अशा डेमोतून बनविलेल्या ५-६ नोटा त्यांना दिल्या. त्यांनी त्या वापरल्या व कोणाला संशय आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना भारतीय चलनातील हुबेहुब ३० लाख रुपयांच्या नोटा देतो, असे सांगितले. त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. तेव्हा त्यांनी ५ लाख ३४ हजार रुपये दिले. हुबेहुब रुपये देतो, असे सांगून त्यांना पैसे दिले नाही. तसेच त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पिस्तुलातील गोळ्या घालून जीव ठार मारण्याची धमकी दिली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्या