Municipal Corporations | पुणे : धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभाव आणि दिवसेंदिवस बदलत जाणारी लाईफस्टाईल यामुळे विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोरोना संसर्गानंतर तरुणांमध्ये बीपी आणि शुगर आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून या दोन आजारांवरील जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार असून याबाबतचा प्रस्ताव पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीकरिता ठेवण्यात आला आहे.
पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात तर शहरी गरीब योजनेअंतर्गत अनेक आजारांवर उपचार देखील केले जातात. पुणेकरांना या योजनेचा चांगला फायदा होतो. मात्र, असांसर्गिक आजारांमधील बीपी आणि शुगर असे आजार असणार्या रूग्णांची संख्या कोरोनानंतर झपाटयाने वाढत आहे.
एवढेच नव्हे तर काही कुटुंबामध्ये 3 ते 4 रूग्ण आढळतात. त्यामधील काही रूग्णांना आनुवंशिक मधुमेह (शुगर) असतो. त्यांचा महिन्याकाठी मोठा खर्च औषधांवर होतो. काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या असांसर्गिक आजारांवरील औषधे मोफत देण्यात येतात.
त्याच पार्श्वभुमीवर आता पुणे महानगरपालिकेने सुध्दा बीपी आणि शुगर यांच्यावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून 45 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून मनपा देखील यासाठी निधीची आर्थिक तरतूद करणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune : परदेशी भेटवस्तू पाठवून महिलांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pune Crime : पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू ; तळेगाव दाभाडे परिसरातील घटना..