Vikas Dangat | पुणे – कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जात नसल्या तरी, पक्षीय राजकारणाचा प्रभाव या निवडणुकीवर दिसून येत आहे. अशात पुणेच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत आहेत. असा आरोप करत त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने दांगट यांनी हकालपट्टी करीत असल्याचे गारटकर यांनी यावेळी जाहिर केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हवेली तालुक्यात ग्रामपंचायत आणि सोसायटी विभागात प्राबल्य असून ही निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासाठी अत्यंत सोपी होती. असे असताना आणि त्यांच्याकडे पक्षाच्या पॅनलबाबत सातत्याने विचारणा करत असताना त्यांनी असा पक्षाला सोडून का निर्णय घेतला. याचा विचार केला असता, त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले. अजित पवार यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता.
त्यांच्या आदेशानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. परंतु, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले असल्याचे गारटकर यांनी सांगितले.
एक वर्षापुर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के आणि दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघे राष्ट्रवादीचे परंतु त्यांच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता.
त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!