Pune | यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव – चौफुला परिसरात चेन्नईमधून (रेफ्रिजरेटर) फ्रिज घेऊन निघालेल्या बंद कंटेनरने अचानक पेट घेतल्याने फ्रिजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी (ता.. २५) दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
मिळालेली माहितीनुसार, चेन्नईमधून (रेफ्रिजरेटर) फ्रिज घेऊन एक कंटेनर हा मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र केडगाव चौफुला परिसरात कंटेनर बंद पडल्याने एका जागेवर उभा होता. या कंटेनरमध्ये चेन्नईतून सॅमसंग कंपनीचे रेफ्रिजरेटर भरून आणले होते.
त्यावेळी प्रचंड धूर येत असलेल्या कंटेनरला पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. परंतु कंटेनर बाजूला घेईपर्यंत मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक विभागातील अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. त्यांनी आग तत्काळ आटोक्यात आणली.
दरम्यान, या प्रकाराने सोलापूरकडून पुण्याकडे जाणारा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता. आगीमध्ये कंटेनरमध्ये असलेले रेफ्रिजरेटरचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात
Yavat Crime : अवैध दारू विक्री प्रकरणी कानगाव येथील एकावर गुन्हा दाखल..!
Yavat News : अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत