Pune Crime पुणे : पिसोळी येथील ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा छडा अवघ्या एका तासाच्या आत लावण्याची कामगिरी कोंढवा पोलिसांनी केली आहे. दारू पिताना झालेल्या वादातूनच मित्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी तासाभराच्या आत उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकल्या.
महेश महादेव ओव्हाळ (वय-३२, रा. सिध्दार्थ नगर, पिसोळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर हकिमुद्दीन तायरभाई बारोट (वय-६६, रा. पिसोळी ग्रामपंचायत मागे, पिसाळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृतक हकिमुद्दीन यांची पत्नी मरियम हकिमुद्दीन बारोट यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
पिसोळी परिसरातील एका मोकळया जागेमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळयात पडला आहे. त्याच्या डोक्यात व उजव्या डोळयातून रक्त येत आहे. असा कॉल कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये आला होता. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना खून झालेल्या व्यक्तीचे नाव हकिमुद्दीन आहे. असे समजल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली.
सदर खुनाचा तपास करीत असताना, पोलिस अंमलदार संतोष बनसुडे, अनिल बनकर व सुरज शुक्ला यांना बारोटचा खून हा त्याच्याच मित्र महेश महादेव ओव्हाळ याने केला आहे. आणि महेश हा सध्या सिध्दार्थनगर परिसरात फिरत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी महेश याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सांगितले कि, हकिमुद्दीन बारोट यांच्यासोबत दारू पित असताना बारोट यांनी महेशला आईवरून शिव्या दिल्या होत्या. याचा राग मनात धरून आरोपी महेशने बारोट यांच्या डोक्यात फरशीने मारून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. कोंढवा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : खळबजनक! कोंढव्यात 62 वर्षीय ज्येष्ठाचा डोक्यात फरशी घालून खून
Lonavala Crime | पवना धरणात बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अखेर यश
Pune Crime : सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला तब्बल २३ लाखांचा गंडा