पुणे : Ajit Pawar – “तीन अपत्ये असलेल्या खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं,” अशी मागणी अजित पवारांनी (Ajit Pawar ) केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. ते बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत होते. (Ajit Pawar )
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले…
जगभरातील लोकसंख्येच्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशन्स पॉप्युलेशनच फंडचा (UNFPA) अहवाल अलीकडेच समोर आला आहे. त्यात भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकल्याचं सांगितलं आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४२८ दशलक्ष झाली आहे. तर, चीनची लोकसंख्या १४२५ दशलक्ष एवढी आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “देशात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. पण, तीन अपत्य असूनही काही खासदार आणि आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.”
“खासदार आणि आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे तीन अपत्य असलेल्या आमदार आणि खासदारांना केंद्र सरकारने अपात्र ठरवावं,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. याबाबत वृत्त एका वृत्तवाहिनेने प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवारांनी लोकसंख्येवरून जोरदार टोलेबाजी केली होती. “जगात सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशात झाली आहे. त्यामुळे आता अतिशय कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. संतती प्राप्ती ही काही देवाची कृपा नव्हे, तर ही नवरा बायकोची कृपा असते. हे कृपया आपण सर्वांनी आता तरी मान्य करायला हवं.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा : अजित पवार…