Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 24 April 2023, 19:13

पुणे- Pune News : राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरिद्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  (Pune New)

 

नवी पेठेतील पत्रकारभवन येथे  पत्रकार परिषद पार पडली. 

नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सरचिटणीस अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, मध्यप्रदेश प्रभारी ऐश्वर्या भद्रे आदी उपस्थित होते.

सुबोध हरिद्वाल म्हणाले, “देशातील प्रश्नांवर आवाज उठवू शकणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१९ मध्ये ‘यंग इंडिया के बोल’ हे व्यासपीठ सुरु झाले. त्यामाध्यमातून देशातल्या युवकांना राजकीय मंच तयार करून दिला जातो. काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधी हे सतत युवकांना राजकारणामध्ये संधी देण्यासाठी आग्रही असतात. ‘यंग इंडिया के बोल’च्या माध्यमातून देशातील हजारो युवकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकतांत्रिक मुद्द्यांचे रक्षण तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी उपयुक्त ठरेल. मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावापर्यंतच्या सर्व युवकांना ‘यंग इंडिया के बोल’च्या माध्यमातून राजकारणामध्ये येण्याची संधी मिळेल.

‘यंग इंडिया के बोल’ ही एक भाषण आणि वादविवाद स्पर्धा आहे, ज्यात सबंध देशातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील. आलेल्या अर्जाची छाननी करून जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाते ज्याच्यामध्ये वाक-कला, विचारधारा आणि राजकीय समज अशा मुद्द्यांवरती परीक्षण केले जाते. निवडक स्पर्धकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संबंधित राज्याच्या राजधानी येथे स्पर्धा आयोजित केली जाते भाषण, वादविवाद व क्रिएटिव्ह भाषण या श्रेणीमध्ये त्यांची निवड केली जाते. स्पर्धेची भाषेचे माध्यम हिंदी, इंग्लिश आणि सर्व प्रादेशिक व स्थानिक भाषा मध्ये असते त्यासाठी स्पर्धक स्वतः आपली भाषा निवडू शकतात. ‘यंग इंडिया के बोल’ची अंतिम स्पर्धा दिल्ली येथे होईल. त्यामध्ये राज्यस्तरीय विजेते स्पर्धक भाग घेतात आणि भाषण वादविवाद व क्रिएटिव भाषण या श्रेणीमध्ये विजेता घोषित केला जातो, असे हरिद्वाल यांनी नमूद केले.

निवड करणाऱ्या पॅनलमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ता, वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व शोधार्थी आदींचा समावेश असतो. विजेता स्पर्धकांना भारतीय युवक काँग्रेसमध्ये प्रवक्ता म्हणून नियुक्ती देण्यात येते. या नियुक्त जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय सुद्धा होतात. या युवकांनी जनसामान्यांचा आवाज बनत देशातील बेरोजगारी, महागाई असे विविध ज्वलंत प्रश्न मांडावेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत स्पर्धा होईल. देशाचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, काँग्रेस पक्षाचे योगदान आणि केंद्र सरकारचे अपयश यावर तरुणांनी जाहीरपणे बोलले पाहिजे हा स्पर्धेमागचा उद्देश आहे. काँग्रेसचा इतिहास आणि केंद्र सरकारचे अपयश मांडण्यासाठी ही स्पर्धा होत आहे, असेही दीपक राठोड यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bodybuilding : पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार राज्यस्तरीय “महाराष्ट्र श्री २०२३” शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा…!

Pune News : पुण्यात १२ व्या राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…!

Bhigvan : पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये अधिक संधी ; पोलिस अधिक्षक आनंद भोईटे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापुरात तुफान राडा! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

Eknath Shinde : शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार : मुख्यमंत्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.