युनूस तांबोळी
Shirur News शिरूर : फाकटे ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायतीची पंधरा वित्त आयोगातील २०२०-२०२१- २०२२ अशी सर्व कामे मंजूर असूनही पुर्णत्वाला नेली नाहीत. वारंवार या बाबत तक्रार देऊन ही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने मंगळवार ( ता. २५ ) ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज हे उपोषणाला बसणार होते. मात्र एक महिण्यात होणारी कामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज यांनी उपोषण मागे घेतले आहे.
फाकटे ( ता. शिरूर ) येथे २०२०- २०२१ व २०२१-२०२२ या वर्षात फाकटे ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी संकलन १ लाख रूपये, हातपंप दुरूस्ती २० हजार, भिल्ल वस्ती पाणि टाकी बांधणे ७० हजार रूपये, नाना नानी पार्क तयार करणे १ लाख ९५ हजार रूपये, सावर्जनिक ठिकाणी मुतारी बांधणे १ लाख ४० हजार रूपये, निर्जतूकीकरण करणे १५ हजार रूपये, आरोग्य उपकेंद्र फर्निचर खरेदी ५० हजार रूपये, शाळा साहित्य खरेदी५८ हजार ७७८ रूपये, पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती ६२ हजार रूपये, अंगणवाडी तार कंपाऊड ५८ हजार ८३२ रूपये, मागासवर्गीय वस्तीवर पाणि पुरवठा ८६ हजार ८४९ रूपये ही कामे मंजूर झाली होती.
त्यापैकी असणारी कामे सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असूनही ही कामे सुरू न केल्याने युवकांमध्ये नाराजी व्यक्त केली गेली. यासाठी मंगळवार ( ता. २५ ) येथील वाळूंज उपोषणाला बसणार होते.
पुणे प्राईम न्यूज …
यासाठी पुणे प्राईम चे प्रतिनिधी युनूस तांबोळी यांनी मध्यस्थी करून संबधित कामांना महत्व देण्याची मागणी केली. त्यावरून वाळूंज यांनी कामाची पुर्तता व्हावी. यासाठी आश्वासन द्यावे. अशी मागणी करत उपोषण मागे घेतले.
पवन वाळूंज म्हणाले की, ऐन उन्हाळ्यातील कामांना महत्व देऊन कामे करून घेतली पाहिजेत. गेली दोन वर्षे संबधितानी कामे केलीच नाहीत. यासाठी उपोषण करणार होतो. पण ही कामे एक महिण्यात पुर्ण करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत ने दिल्याने उपोषण रद्द करत आहोत. मात्र भविष्यात नागरिकांना वेठीस धरल्यास लोकशाहीच्य़ा मार्गाने पुन्हा उपोषण करणार.
यावेळी ग्रामुपंचायत सदस्य पवन वाळुंज, ग्रामसेवक स्वप्निल कवडे, सरपंच रेखा गाजरे, नितीन पिंगळे, विकास दरेकर, मनिष बोऱ्हाडे, महेश टेके, स्वप्निल वाळुंज, खजीन आंदे, सागर आंद्रे, सतीष आंद्रे, उपसरपंच रामदास चव्हाण, सिमा कोदारी, मधुकर डिंगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंच रामदास चव्हाण म्हणाले की, पंधरा वित्त आयोगाची कामे जेवढी रितसर परवानगीने सुरू करण्यात आलेली आहेत. होणारी सर्व कामे एक महिण्यात पुर्णत्वाला नेणार आहोत.
प्रशासकीय अडचणी…
प्रत्येक गावात पंधरा वित्त आयोगाची कामे करण्यात येतात. या कामांची पुर्तता करताना प्रशासकिय समस्या मोठ्या आहेत. संबधीत कामाचे इस्टिमेट करत असताना त्या विभागाचे शाखा अभीयंता तत्काळ कामे करत नाहित. त्यातून निविदा, ठेकेदार नेमणे यासारख्या अडचणी तयार होतात. त्यातून कामांना वेळ लागतो. प्रशासकिय अडचणी तयार होऊ नयेत. यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे.