Breaking News मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे. राजधानी दिल्लीत राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याच्या संदर्भात मोठ्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होऊ शकतात. असा दावा करत ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे.
राऊंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहे. म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत…!
मला माहित आहे की, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत. हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये आणि भाजपला जे पाहिजे ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. भाजपला आमचं सरकार पाडायचं होतं त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला ते काम पुर्ण झालं. पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भाजपला ताकत देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी झाले आहेत आणि हे सरकार आल्यापासून शिंदे गटा सोबत भाजप देखील बदनाम होतोय. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याशी तातडीनं संवाद साधला असल्याची माहिती राऊत यांनी दिली.