Pune Crime पुणे : समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले…!
तक्रारदार डॉक्टर महिला शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे. आरोपींनी डॉक्टर महिलेला समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्स) दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी संदेशाव्दारे दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते. सुरुवातीला डॉक्टर महिलेला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले.
सायबर चोरट्यांनी आणखी पैसे देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांना वेळोवेळी आमिष दाखवून त्यांच्याकडून २३ लाख ८३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान