Accident | पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावर खासगी बस व ट्रकचा झालेल्या अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात जांभूळवाडी दरी पुलाजवळील रविवारी (ता.२३) पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता ट्रॅव्हल्सची बस कोल्हापूरहून डोंबिवलीला जात होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरहून अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. पहाटे सर्व प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत असतानाच अचानक हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांची भंबेरी उडाली.
यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा अशा चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस व अग्निशमन दलाचे जवानानी तत्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ४ अग्निशमन वाहने व १ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून १ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ७ अग्निशमन वाहने जवानांसह घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.
रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा…
दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे तसेच अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याशिवाय अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे याची ओळख पटवली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Accident : नवीन कात्रज बोगद्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू