विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : Haveli – हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. (Haveli) निवडणुकीच्या रिंगणात 57 उमेदवार असले तरी, खऱी लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल व भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलमध्येतच लढत होणार आहे. (Haveli)
भाजप व मित्रपक्ष यांच्या सर्वपक्षीय पॅनेलचे तगडे आव्हान
राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हातच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडात श्रींमत बाजार समिती असा लौकिक असणाऱ्या हवेली बाजार समितीच्या सत्तेच्या सारीपाटासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल समोर भाजप व मित्रपक्ष यांच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या सर्वपक्षीय पॅनेलने तगडे आव्हान उभे केले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय विकास दांगट यांनी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत जगताप यांना हाताशी धरुन विजय मिळवला होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीमधील विकास दांगट यांचे भिडु पुन्हा एकदा एकत्र येत, बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेल समोर उभे ठाकले आहेत. यामुळे ही निवडणुक गाजणार हे नक्की झाले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांच्यासाठी तब्बल ३०१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९५ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १३८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल व सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीमध्ये येथे लढत होणार आहे. अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला छत्री हे चिन्ह मिळाले असून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
बाजार समितीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातुन एकुन अकरा संचालक निवडले जाणार असुन एकरा जागांच्या साठी निवडणुकीच्या रिंगणात एकुण २९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात एकुण ४ संचालक निवडले जाणार आहेत.
त्यापैकी ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात २ संचालक निवडले जाणार असून येथे ६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघात १ संचालक निवडला जाणार असून येथे ३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघात १ संचालक निवडले जाणार असून येथे २ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. व्यापारी आडते मतदारसंघात २ संचालक निवडले जाणार असून येथे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. हमाल मापाडी मतदारसंघात १ संचालक निवडला जाणार असून येथे ५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
मतदारसंघ निहाय एकुण उमेदवार –
आंबेकर ज्ञानेश्वर सुभाष, चरवड कुलदिप गुलाबराव, चौधरी धनंजय नानासो, चोरघे दत्तात्रय दिनकर, दांगट नितिन पंढरीनाथ, गायकवाड अशोक सुदाम, गायकवाड सचिन चंद्रकांत, गोते संदिप माणिकराव, जगताप प्रकाश चंद्रकांत, काळभोर दिलीप काशिनाथ, काळभोर प्रशांत दत्तात्रय, कांचन राजाराम आबुराव, कांचन संतोष आबासाहेब, म्हस्के शेखर सहदेव, पायगुडे दत्तात्रय लक्ष्मण, शेवाळे मनोहर वसंत, शेवाळे समीर रमाकांत, शिंदे पोपटराव लक्ष्मण, शितोळे योगेश बाळासाहेब, उंद्रे रोहिदास दामोदर, वारघडे चंद्रकांत गोविंद
– सेवा सहकारी संस्था महिला राखीव – चांदेरे सरला बाबुराव, हरगुडे सारिका मिलिंद, हरपळे मनिषा प्रकाश, कांचन प्रतिभा महादेव
– सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग – गायकवाड शशिकांत वामन, घुले सचिन सुभाष
– सेवा सहकारी संस्था- विमुक्त जाती / भटक्या जमाती – केसकर लक्ष्मण साधू, मदने अर्जुन पिलाजी
ग्रामपंचायत मतदार संघ- चौधरी धनंजय नानासो, चौधरी सुदर्शन जयप्रकाश, काळभोर राहूल रामचंद्र, महाडिक आण्णा भाऊसो, सातव रामकृष्ण हेमचंद्र, वांजळे शुक्राचार्य हिरामण, आबनावे नानासाहेब धोंडिबा, गायकवाड सागर तुकाराम, गायकवाड सत्यवान दगडू., कंद रविंद्र नारायण, पारगे नवनाथ रोहिदास
व्यापारी- आडते मतदार संघातील निवडणूक- बडदे रमेश बळवंत, बागवान उमरफारुक शब्बीर, बनसोडे सुहास मारुती, भिसे बाळासाहेब ऊर्फ रविंद्र शिवाजी, भोसले अनिरुद्ध अरुण, भुजबळ विलास दत्तात्रय, गावडे अशोक रामभाऊ, घुले अमोल मुरलीधर, घुले गणेश सोपानराव, कुंजीर सौरभ शेखर, शेवते अविनाश चंद्रकांत, सुर्यवंशी शिवाजी आबासाहेब.
हमाल मापाडी मतदार संघातील निवडणूक- चोरघे राजेंद्र ज्ञानोबा, दसवडकर गोपाळ निवृत्ती, मेंगडे गोरख मारुती, नांगरे संतोष मारुती, उंद्रे संजय बाजीराव
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘त्या’चार उमेदवारांचे अर्ज कायम…
Market Committee Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल ३०१ अर्ज दाखल..!