बंगळुरू : दिव्यांग मुलगी आपल्या करिअरच्या आड येत असल्याच्या कारणाने चक्क जन्मदात्या डॉ. आईने मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
A woman was arrested in #Bengaluru for killing her four-year-old mentally challenged daughter by throwing her from the fourth floor of a building, police said. pic.twitter.com/S96GaVblxx
— IANS (@ians_india) August 5, 2022
सुषमा भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुषमाचा पती किरणने तिच्याविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा भारद्वाज ह्या दातांच्या डॉक्टर आहेत. किरण व सुषमा भारद्वाज हे सीकेसी गार्डन परिसरातील अद्वैत आश्रय अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांना चार वर्षापूर्वी एक मुलगी झाली होती. मात्र त्यांची मुलगी दिव्यांग होती. त्यामुळे सुषमाता दिवसभर तिची काळजी घेत राहावी लागायची. त्यामुळे सुषमाला डिलिव्हरीनंतर पुन्हा तिचे करिअर सुरू करू शकत नव्हती. त्यामुळे ती वैतागली होती.
दरम्यान, एके दिवशी सुषमा आपल्या मुलीला चक्क एका रेल्वे स्थानकात एकटी सोडून घरी निघून आली होती. तिच्या पतीला किरणला ते समजल्यानंतर तो तत्काळ तिथे गेला व मुलीला घरी घेऊन आला. त्यानंतर त्याने सुषमाचीही समज काढती. मात्र सुषमा त्या मुलीचा रागही करू लागली होती.
सुषमाने गेल्या आठवड्यात दिव्यांग मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर ती स्वतः देखील उडी मारायचा प्रयत्न करत होती. मात्र तिची हिमत झाली नाही. याप्रकरणी किरणने सुषमाच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी सुषमाला अटक केली आहे.