Pimpri Crime | पिंपरी, (पुणे) : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकामाचे साहित्य चोरून नेणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अली अब्दुल रहीम साहू (वय-२६, रा. कुदळवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश), जमाल अख्तर सबिर अहमद चौधरी (वय- ३८, रा. कुदळवाडी, मूळ रा. उल्हासनगर, ठाणे), मोहम्मद इसरार मेहमूद शाह (वय- ३२, रा. कुदळवाडी, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक अनिलकुमार श्रीधरन पणीकर (वय-५०, रा. देहुरोड) यांचे बांधकामाचे साहित्य बुधवारी (ता. ०५) सावरदरी (ता. खेड) येथून चोरीला गेले होते. याप्रकरणी पणीकर यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि सदरची चोरी हि वरील तिघांनी केली आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींनी बांधकाम साहित्य चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले. लोखंडी सेंट्रिंग प्लेटा, गोलाकार लोखंडी पाईप, लोखंडी शिकंजा व टेम्पो जप्त असा सात लाख ९७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले.