युनुस तांबोळी
Shirur News | शिरूर : फाकटे ( ता. शिरूर ) येथील ग्रामपंचायतीची पंधरा वित्त आयोगातील २०२०-२०२१- २०२२ अशी सर्व कामे मंजूर असूनही पुर्णत्वाला नेली नाहित. ग्रामपंचायतीची मंजूर कामे बेजबाबदारीमुळे ठप्प आहेत. तातडीने येथील कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. वारंवार या बाबत तक्रार देऊन ही ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने मंगळवार ( ता. २५ ) उपोषणाला बसणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज यांनी दिली.
फाकटे ( ता. शिरूर ) हे गाव कमी लोकवस्तीचे गाव असले तरी देखील रामनगर म्हणून हे गाव तालुक्याच्या विशेष लक्षात राहण्यासारखे गाव आहे. येथील विकास कामे करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटिल, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे हे नेहमी कार्यरत असताना दिसतात. त्यातून विकासाची कामे आणण्यासाठी येथील ग्रामस्थ नेहमीच तत्पर असतात.घोडनदी किनारी असणारे गाव असल्याने वळसे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून लघू पाटबंधारे विभागाकडून येथे छोटा बंधारा बांधण्यात आला. त्यातून गावच्या पाण्याचा प्रश्न काहि अंशी कमी झालेला पहावयास मिळतो.
फाकटे ग्रामपंचायमध्ये २०२०- २०२१ व २०२१-२०२२ या वर्षात विविध विकास कामांना मंजूरी मिळाली आहे. सार्वजनिक ठिकाणि पाणी संकलन १ लाख रूपये, हातपंप दुरूस्ती २० हजार, भिल्ल वस्ती पाणि टाकी बांधणे ७० हजार रूपये, नाना नानी पार्क तयार करणे १ लाख ९५ हजार रूपये, सावर्जनिक ठिकाणि मुतारी बांधणे १ लाख ४० हजार रूपये, निर्जतूकीकरण करणे १५ हजार रूपये, आरोग्य उपकेंद्र फर्निचर खरेदी ५० हजार रूपये, शाळा साहित्य खरेदी ५८ हजार ७७८ रूपये, पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती ६२ हजार रूपये, अंगणवाडी तार कंपाऊड ५८ हजार ८३२ रूपये, मागासवर्गीय वस्तीवर पाणि पुरवठा ८६ हजार ८४९ रूपये ही कामे मंजूर झाली आहेत.
त्यापैकी कोणतीच कामे सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असूनही ही कामे सुरू न केल्याने येथील युवक वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. ही कामे सुरू व्हावीत यासाठी बुधवार ( ता. ५ ) तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र तरीदेखील ग्रामपंचायत स्थरावर कोणतीच दखल घेतली नाही. यासाठी मंगळवार ( ता. २५ ) येथील वाळूंज उपोषणाला बसणार आहेत.
सरपंच रेखा गाजरे फाकटे म्हणाल्या कि, पंधरा वित्त आयोगातील कामांना गती देऊन पुर्ण करण्याचे काम केले आहे. जवळपास 4 कोटी 85 लाखाची कामे मंजूर करून आणली आहेत. मात्र यात तांत्रीक अडचणी असल्याने ही कामे होऊ शकली नाही. वरीष्ट कार्यालयातून कामाच्या निवीदा आल्या नाहित. तरीहि कामे पुर्ण करण्याचे काम करत आहोत.
पवन वाळूंज म्हणाले की, ऐन उन्हाळ्यातील कामांना महत्व देऊन कामे करून घेतली पाहिजेत. गेली दोन वर्षे संबधितानी कामे केलीच नसल्याने या बाबत गटविकास अधिकारी मार्फत या अधिकारी व पदाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. यासाठी उपोषण करणार आहे.
ग्रामसेवक स्वप्निल कवडे म्हणाली की, सदरहू कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी काहि कामे सुरू करण्यात आलेली आहेत. याबाबत संबधितांना सोमवार ( ता. २४ ) लेखी पत्र दिले जाईल. काहि कामांची निविदा देण्यात आलेली आहे. तत्काळ ही सर्व कामे सुरू करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती
Shirur Crime : धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला ; दोघेजण जखमी, तळेगाव ढमढेरे परिसरातील घटना..!