हनुमंत चिकणे
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १० हजार विद्यार्थ्यांचे समूह गायन करणार आहेत. तर कुंजीरवाडी येथे शासकीय दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हि माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.
”आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” हवेली उपविभागीय कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी येथे आज शुक्रवारी (ता.५) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरील माहिती उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे. यावेळी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र शासन, पर्यटन व संस्कृती कार्य विभाग यांच्याकडील शासन निर्णय दिनांक ३० जुन २०२२ नुसार आदेश निर्गमित करणेत आलेले आहेत. त्याअनुषंगाने हवेली तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमामध्ये खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविड लसीकरण, कॅम्प, स्वतंत्र सैनिकांचा सन्मान, वृक्षारोपण कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, समूह गायन, अदिवासी व कातकरी समाजाच्या नागरिकांना जातीचे दाखले, आधार कार्ड, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि शासकीय दाखल्यांचे वाटप आणि प्रभात फेरी, हेरिटेज ऑफ, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास वंदन, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या स्मारकास वंदन करण्यात येणार आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विदयालय सोमवारी (ता.८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुमारे १० हजार विद्यार्थ्यांच्या समूह गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कुंजीरवाडी येथे मांग गारुडी समाजाच्या नागरिकांना शुक्रवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय दाखले वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘आझादी का अमृत महोत्सवानिमित्त” हवेली उपविभागीय कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. भारताच्या स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त साज-या होणा-या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी उच्यपुर्तपणे सहभाग नोंदवावा. असे अवाहन हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी केले आहे.