सागर जगदाळे
भिगवण : Bhigvan – पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबच अभियांत्रिकी, वैदयकिय क्षेत्रातील विदयार्थ्यांचाही कलही स्पर्धा परिक्षांकडे वाढला आहे. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये असलेले बहुतेक विषय़ हे कला, विज्ञान व वाणिज्य अशा पारंपारिक शाखांमधील अभ्यासक्रमांचाच भाग असतात. Bhigvan स्पर्धा परिक्षेची तयारी करताना ग्रामीण व शहरी असा कोणताही फरक नसतो. Bhigvan त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये अधिक संधी आहेत. असे मत पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी व्यक्त केले.
‘अधिकारी आपल्या भेटीला’ या उपक्रमांमध्ये पोलिस अधिक्षक आनंद भोईटे बोलत होते
कला महाविदयालयांमध्ये आयोजित कर्मयोगी करियर कट्टा विभागाअंतर्गत ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या उपक्रमांमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजवर्धन पाटील होते.
भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार, माजी सरपंच पराग जाधव, माजी उपसभापती संजय देहाडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर, भादलवाडीचे सरपंच शिवाजी कन्हेरकर, महाविदयालय विकास समितीचे सदस्य रणजित भोंगळे, प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज उपस्थित होते.
भोईटे पुढे म्हणाले, ”महाविदयालयीन जीवनातील तीन वर्षे हे युवकांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा कालखंड आहे. या कालावधीमध्ये विदयार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी केले. सुत्रसंचालन करियर कट्टा विभागाचे प्रमुख प्रा. शाम सातर्ले यांनी तर आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले..