Rahul Gandhi सूरत : काँग्रेस नेते राहुल Rahul Gandhi गांधींच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मोदी आडनावाच्या मानहानी प्रकरणामुळे राहुल गांधी यांना खासदारी गमावावी लागली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली आहे. आता राहुल गांधींना सूरत कोर्टाने झटका दिला आहे.
सूरत न्यायालयाने अर्ज फेटाळला…!
मोदी आडनावाच्या मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात राहुल गांधींनी केलेला अर्ज सूरत न्यायालयाने फेटाळला आहे. सूरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.
सुरतच्या सत्र न्यायालयात यापूर्वी हे प्रकरण 13 एप्रिल रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळे राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्वही रद्द झालं. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सूरत कोर्टात आव्हान दिलं. मात्र, सूरत कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.