लहू चव्हाण
Panchgani पाचगणी : स्पर्धा परीक्षा या पदास पात्र योग्य उमेदवार निवडण्यासाठी घेतल्या जातात विद्यार्थ्यांनी परीक्षांना सामोरे कसे जावे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्राचार्य प्रदीप लोंढे यांनी केले.
पाचगणी (Panchgani) (ता.महाबळेश्वर) येथील नगरपालिका शाळा क्रमांक २ येथे कृष्णाई क्रीडा मंडळ, भिमनगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित आयोजित युवक युवतींना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनपर शिबिरात प्रा.लोंढे बोलत होते.
यावेळी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष दिलिप (भाऊ) बगाडे, पोलिस उपनिरीक्षक अरविंद माने, पोलिस हवालदार जितेंद्र कांबळे, मंडळाचे अध्यक्ष प्रणय बगाडे, उपाध्यक्ष आकाश बगाडे, उद्योजक आदित्य भंडारी, अजय मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. लोंढे पुढे म्हणाले..!
”स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपल्यासमोर ‘सर्वोत्तम गुण मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. त्याकरीता स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजून घेणे महत्वाचे आहे.
यावेळी त्यांनी ‘सध्या अभ्यास कसा करता व कसा केला पाहिजे.”
या शिबिरात उपस्थित सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना कृष्णाई क्रीडा मंडळ, भिमनगर यांच्यावतीने जेवणाची सोय करण्यात आली होती.
शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रतिक बगाडे, केदारनाथ प्रभाळे, सौरभ कांबळे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन व आभार प्रकाश भोसले यांनी मानले.