Poetry – वास्तव प्रेमाच – काव्यपुष्प…
पत्नीच्या मृत्यूचा कडा कोसळला संसारावर
अश्रू ओघळू लागले तिला पाहता सरणावर
एकटेपणाच ओझं घेऊन आपल्या शिरावर
काटे तुडवित चालतोय आयुष्याच्या वाटेवर
संसारात असतात पती पत्नीचे हातात हात
वाढत्या वयात होतील का दोनाचे चार हात
माझा प्रवेश व्हावा एखाद्या स्त्रीच्या मनात
तिने पती म्हणून माझे घ्यावेत हातात हात
नवरदेव व्हायचं मी अगदी घेतलंय मनावर
शरीर लेऊन बसलय प्रेमाच सुगंधी अत्तर
एखादी समदुःखी स्री मज भेटावी लवकर
पत्नी होऊन तिने सुखी करावे मज निरंतर
शरीर सौंदर्याची मोहिनी असते तारुण्यात
प्रेमळ सहवास हवा वाटतो वाढत्या वयात
वृक्षासारखी सावली देईन तिला संसारात
मला जागा मिळावी तिच्या प्रेमळ हृदयात
मोठ्या मनानं मी देईन पत्नीला सदा मान
तिला सुख मिळेल याच सदा ठेवीन भान
प्रेमाने वागून वाढविन मी संसाराची शान
वाढत्या वयातील लग्नाचा वाढविन मान
(कवी – चंद्रप्रकाश कवितके, पुणे)
अधिक काव्यपुष्प वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
काव्यपुष्प : ये मेघराजा… युनूस तांबोळी
काव्यपुष्प : जीवन माझ खुप गुंतागुंतीचे – युनूस तांबोळी