मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाह कुणाल बेनोडेकर यांच्याबरोबर ७ मे २०२१ रोजी झाला होता. त्यांनी लग्न कोर्टात केल्यामुळे सोनालीला कोणतीच हौस करता आली नाही. म्हणूनच सोनालीने पुन्हा एकदा मे महिन्यात कुणालशी लग्न केले. या संदर्भात एक पोस्ट देखील सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली होती.
सोनाली-कुणाल या मराठी कलाकाराची विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण विवाहसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे. लंडनमध्ये सोनाली-कुणालचा विवाहसोहळा कसा पार पडला हे लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येईल.
दरम्यान, आज पती कुणालच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने चाहत्यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.
याबाबत बोलताना सोनाली म्हणाली कि, ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आले नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल.” येत्या ११ ऑगस्टला प्लॅनेट मराठीवर लग्नाचा व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे.