युनूस तांबोळी
Shirur | शिरूर : कडाक्याच्या उन्हात शिक्षणासाठी अनवाणी फिरणारे जवळके बुद्रुक ( ता. खेड ) ठाकरवाडी येथील आदिवासी विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील रियालिटी कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक शादाब तांबोळी यांना दिसले. त्यांनी तातडीने या अनवाणी फिरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बूटचे वाटप केले.
रमजान महिन्यात मंगळवार ( ता. १८ ) २७ वी शब नुकतीच पार पडली. या रात्रीत आयुष्यात केलेल्या चुकांची माफी आल्लाकडे मागून शांती आणि आमन यासाठी प्रार्थना केली जाते. प्रत्येक मसजीद मध्ये रात्र जागवून नमाज पठण करण्यात येते. यानंतर गरीब व गरजूंना दान करण्याचे काम मुस्लिम धर्मींयामध्ये करण्याचे काम केले जाते.
आंबेगाव तालुक्यात अशा प्रकारे सध्या रमजान सणाचे पावित्र राखण्याचे काम सुरू आहे. पेठ ( ता. आंबेगाव ) येथील रियालिटी कन्स्ट्रक्शनचे युवा उद्योजक शादाब तांबोळी हे कामानिमित्त खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक येथील ठाकरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांनी शिक्षणाची आवड असणारे आदिवासी विद्यार्थी अनवाणी पायाने शाळेत येत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की या मुलांना बूट दिले तर यांच्या जीवनात थोडाफार आनंद निर्माण करू शकतो.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान…
त्यानूसार त्यांनी या शाळेला चाळीस बुट भेट दिले. मोफत मिळणारे बुट पाहून येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद पहावयास मिळाला. त्यावेळी रमजान च्या पवित्र महिण्यात दान केलेल्या या उपक्रमाचा आनंद देखील तांबोळी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी उपसरपंच ज्ञानू मोतीराम पारधी, चंद्रकांत खंडागळे, दत्तात्रेय कराळे, लिंबाजी पारधी, विठ्ठल पारधी, मुख्याध्यापक बबन सोनवणे, छाया सोनवणे, सुनीता केदारी, मंगल कराळे आदी उपस्थित होते.
शिक्षणाचे खरे महत्व हे आदिवासी समाजाला आहे. अनवाणी काट्याकुट्यात गलोल घेऊन फिरणारे हात जेव्हा पाटी पेन्सिल हातात घेऊन शिक्षण घेतील. त्यावेळी त्यांच्यातील सामाजीक बदल पहावयास मिळेल. यासाठी मोफत बुट भेट देऊन अगदी खारीचा वाटा उचलला आहे. मात्र या आदिवासी समाजातील मुलांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या उपक्रमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे.
– शादाब तांबोळी, युवा उद्योजक, पेठ ता. आंबेगाव
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur | शिरूर तालुक्यातील पती-पत्नीनंतर आता भाऊ-बहिण एकाचवेळी झाले पोलीस दलात भरती