Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, प्र. प्राचार्यपदी डॉ. ए. के. मंजुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे व संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ही नियुक्ती केली आहे.
या अगोदर प्राचार्य डॉ. सुनीलकुमारे कुरणे हे होते. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार त्यांची बदली बुधवारी (ता. १२) शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे झाली असून त्यांच्या जागी डॉ. ए. के मंजुळकर यांची प्र. प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ए. के मंजुळकर हे समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम करत होते.
इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम…
घराण्यात कसलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अत्यंत खडतर परिस्थितीत संघर्ष करून शिक्षण घेत त्यांनी इतिहास या विषयातून विद्यावाचस्पती ही पदवी प्राप्त करून अनेक पुस्तकांचे लेखन, संदर्भ ग्रंथ, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शोधनिबंधाचे प्रकाशन त्यांनी केले आहे. इतिहास विभाग प्रमुख म्हणून काम करताना महाविद्यालयातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख असेल, विद्यार्थी कल्याण मंडळ, त्याबरोबरच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन विकास समितीत सहभाग घेऊन महाविद्यालयाच्या विकासात योगदान त्यांनी दिले आहे.
विविध प्रकारच्या कार्यशाळा, चर्चासत्रे इत्यादींचे आयोजन करून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांनी आत्तापर्यंत शिक्षणामध्ये योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानामुळेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य अभय कुमार साळुंखेव संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाची जबाबदारी म्हणून त्यांना प्र. प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, संस्थेतून तसेच संस्थेच्या विविध शाखेमधून, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीकडून, लोणी काळभोर व परीसारतील ग्रामस्थांकडून सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Summer Camp | लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी शिबीराचा लुटला आनंद