Pimpri Crime पिंपरी, (पुणे) : निगडीतील ओटास्कीम पोलीस चौकीतील स्वच्छतागृहात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली Pimpri Crime आहे.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे. सोमवारी (ता. १७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार..!
निगडी पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना निगडी पोलिसांनी एका २९ वर्षीय संशयित महिलेला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी सुरू असताना तिने पोलीस चौकीतील बाथरूम मध्ये जाऊन लोखंडी ग्रीलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, महिला शौचालयात जात असताना तिच्यासोबत महिला पोलीस कर्मचारी होत्या. महिला पोलीस शौचालयाच्या बाहेर थांबल्या होत्या. बराच वेळ संशयित महिला शौचालयातून बाहेर येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता संशयित महिलेने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.