राहुलकुमार अवचट
Babasaheb Ambedkar Jayanti 2023 | यवत – दौंडच्या पश्चिम भागातील बोरीऐंदी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सामाजिक राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे सकाळी पूजन करण्यात आले. अक्षय ब्लड बँक, हडपसर यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी एकूण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी ब्लड बँकेचे डॉ. निलेश पाटील आणि त्यांचे सहकारी, सरपंच जीवन पवार, जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार, भीमशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
१३२ पुस्तके फुलोरा ग्रंथालयास भेट…
सायंकाळी प्रा, मुकुंद सोनटक्के याचे फुले यांचे जीवनावर व्याख्यान झाले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी पुणे येथून आंबेडकर ज्योत प्रज्वलित करून गावात आणण्यात आली. ग्रामस्थ आणि तरुणांनी ज्योतीचे स्वागत केले व प्रतिमा पूजन करण्यात आले. तर १३२ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १३२ पुस्तके फुलोरा ग्रंथालयास भेट देण्यात आली.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्तपणे भाषणे झाली. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. जयंती निमित्त निळे ध्वज, बॅनर विजेची रोषणाई करण्यात आली होती, कार्यक्रमात महिला , मुले मुली मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश शेलार, ऋषिकेश शेलार, अमोल शेलार, यश शेलार,रुपेश शेलार, शेलार, धीरज शेलार, पनू शेलार, पंकज शेलार तुषार शेलार, सोमनाथ शेलार, अनिकेत रणपिसे, म्हेहेंद्र साबळे, विकास शेलार, तानाजी शेलार अमोल शेलार अनुष्का शेलार, पायल शेलार, प्राची शेलार, मानसी शेलार, प्रगती शेलार,सार्थक रणपिसे, जय ओव्हाल, , सुध्दार्थ शेलार , सार्थक शेलार, आयुष्य शेलार आदि उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khed News : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा ६ वर्षीय मुलीवर हल्ला ; आंबेगाव परिसरातील घटना..!