Election | लोणी काळभोर, (पुणे) : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या माध्यमातुन रिक्त ठेवलेल्या पाच जागांची शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा नावे जाहीर करण्यात आली आहेत.
“अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या पंधरापैकी दहा उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्धवट पॅनेल जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने राष्ट्रवादीने राहिलेल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
यामध्ये सर्वसाधारण जागा दत्तात्रय दिनकर चोरघे (रा. रहाटवडे), कुलदीप गुलाबराव चरवड, (रा. वडगाव बु), संदीप माणिकराव गोते (रा. गोते मळा, वाडेबोल्हाई), महिला प्रवर्ग प्रतिभा महादेव कांचन (रा. उरुळी कांचन), तर अनुसूचित जाती / जमाती आबासाहेब कोंडीबा आबनावे (रा. बकोरी) अशी उशिरा जाहीर करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
पंधरा जणांचे सर्वपक्षीय अधिकृत पॅनेल जाहीर करुन प्रचारात आघाडी…
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्याच गटाची सत्ता यावी यासाठी, मागील दोन महिण्यापासुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर अजित पवार यांचे बाजार समितीवर सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळुन लावण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक विकास नाना दांगट, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह हवेलीच्या तालुक्याच्या सहकारातील अनेक दिग्गज नेत्यांनी पंधरा जणांचे सर्वपक्षीय अधिकृत पॅनेल जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली होती.
सर्वपक्षीय पॅनेलकडे सहकारातील अनेक दिग्गज नेते असल्याने “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” ने पहिल्या टप्प्यातच पुर्ण क्षमतेने प्रचाराला सुरवात केली आहे. हवेली तालुक्यातील दिग्गज नेते बाजार समितीची सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आल्याने व सर्वच नेत्यांनी पैशापेक्षाही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने, बाजार समितीची निवडणुक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
“अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे, : –
(सोसायटी मतदार संघ) रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड (इतर मागास प्रवर्ग), लक्ष्मण साधू केसकर (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग) मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग) सुदर्शन जयप्रकाश चौधरी, शुक्राचार्य हिरामण वांजळे, रवींद्र नारायणराव कंद, सत्यवान दगडू गायकवाड (ग्रामपंचायत मतदार संघ)
“अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल”चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे : –
(सोसायटी मतदार संघ) शेखर सहदेव म्हस्के, संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय दिनकर चोरघे, कुलदीप गुलाबराव चरवड, संदीप माणिकराव गोते, (नागरीकांचा इतर मागासप्रवर्ग) सचिन सुभाष घुले, सरला बाबुराव चांदेरे, (महिला राखीव) प्रतिभा महादेव कांचन, (महिला प्रतिनिधी प्रवर्ग), अर्जुन पिलाजी मदने (विमुक्त जाती व जमाती राखीव) राहुल रामचंद्र काळभोर, रामकृष्ण हेमचंद्र सातव, नवनाथ रोहिदास पारगे आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत).
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Breaking News : गँगस्टर अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या; देशभरात प्रचंड खळबळ
Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!