Pune Airport पुणे : पुणे- दिल्ली दरम्यान उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानातून उतरताना पाय घसरून एअर एशिया कंपनीच्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पुणे विमानतळावर गुरूवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली आहे.
विविन अँथनी डॉमेनिक (वय- ३४, रा. लोहगाव) असे मृत्यू झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पुणे विमानतळावर एअर एशिया या विमान कंपनीसाठी सुरक्षा एजंट म्हणून हा कर्मचारी काम करत होता. सकाळी विमानात प्रवासी चढल्यानंतर हा कर्मचारी विमानातून खाली उतरत होता. त्यावेळी त्याला पायर्या न सापडल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर या कर्मचार्याला तातडीने सह्याद्री रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. विमानतळावर घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावरील अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीची वैद्यकीय सेवेची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी होत आहे.