Election | लोणी काळभोर, (पुणे) : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या माध्यमातुन पंधरापैकी दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अर्धवट पॅनेल जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारी जाहीर करतानाच पिछाडीवर राहिल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती…
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून वेली कृषी उत्पन्न बाजार समिती गणली जाते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या समितीच्या निवडणुकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते.
राष्ट्रवादी कॉग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी “अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल” च्या माध्यमातुन पंधरापैकी दहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह सर्वच पक्षाचे उमेदवार असलेल्या “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” या नावाने सर्वपक्षीय विरोधी पॅनेलने पंधराच्या पंधरा जागी उमेदवार जाहीर करुन, प्रचारात आघाडी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेनेसह सर्वच पक्षाचे उमेदवार असलेल्या पॅनेल” प्रचारात आघाडी घेत असतानाच, पुणे जिल्ह्याच्या सहकारात किंग मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यात पंधरा जागांच्यासाठी पंधरा अधिकृत उमेदवार जाहीर करता न आल्याने, हवेलीसह जिल्हाच्या सहकारक्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजीत पवार, दोन आमदार, डझनभर नेते दिमतीला असतांनाही, हवेलीत पक्षाला उमेदवार मिळु न शकल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीव त्यांच्या मित्रपक्षांनी सोसायटी मतदार संघातुन शेखर सहदेव म्हस्के, संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, सचिन सुभाष घुले (नागरीकांचा इतर मागासप्रवर्ग). सरला बाबुराव चांदेरे (महिला राखीव) व अर्जुन पिलाजी मदने (विमुक्त जाती व जमाती राखीव) राहुल रामचंद्र काळभोर, रामकृष्ण हेमचंद्र सातव, नवनाथ रोहिदास पारगे (ग्रामपंचायत) अशा दहा जणांची यांदी जाहीर केली आहे.
बाजार समितीची निवडणुक पंधऱा जागांच्यासाठी होत असतांना, पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दहाच उमेदवारांची यादी जाहीर केल्याने, विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. दरम्यान उर्वरीत पाच जागांच्याबाबत चर्चा चालु असुन, याबाबतची माहिती लवकरच देऊ असे दिलीप वाल्हेकर यांनी जाहीर केले आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत आपल्याच गटाची सत्ता यावी यासाठी, मागील दोन महिण्यापासुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर अजित पवार यांचे बाजार समितीवर सत्ता मिळवण्याचे मनसुबे उधळुन लावण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक विकास नाना दांगट, ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह हवेलीच्या तालुक्याच्या सहकारातील अनेक दिग्गज नेत्यांनी पंधरा जणांचे सर्वपक्षीय अधिकृत पॅनेल जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे.
सर्वपक्षीय पॅनेलकडे सहकारातील अनेक दिग्गज नेते असल्याने “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” ने पहिल्या टप्प्यातच पुर्ण क्षमतेने प्रचाराला सुरवात केली आहे. हवेली तालुक्यातील दिग्गज नेते बाजार समितीची सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आल्याने व सर्वच नेत्यांनी पैशापेक्षाही आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने, बाजार समितीची निवडणुक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
“अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे,-
(सोसायटी मतदार संघ) रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड (इतर मागास प्रवर्ग), लक्ष्मण साधू केसकर (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग).मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग) . सुदर्शन जयप्रकाश चौधरी, शुक्राचार्य हिरामण वांजळे, रवींद्र नारायणराव कंद, सत्यवान दगडू गायकवाड (ग्रामपंचायत मतदार संघ).
“अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल”चे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे-
शेखर सहदेव म्हस्के, संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, सचिन सुभाष घुले (नागरीकांचा इतर मागासप्रवर्ग). सरला बाबुराव चांदेरे (महिला राखीव) व अर्जुन पिलाजी मदने (विमुक्त जाती व जमाती राखीव) राहुल रामचंद्र काळभोर, रामकृष्ण हेमचंद्र सातव, नवनाथ रोहिदास पारगे (ग्रामपंचायत)