पुणे : महापालिका निवडणुकीत जी (2022) नवी वॉर्डर रचना तयार करण्यात आली होती. ती वॉर्ड रचना रद्द करण्यात आली आहे. तर (२०१७) मधील प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका झाल्या होत्या त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे यंदाही निवडणूक घेण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांची समीकरणे पूर्णपणे हलवून टाकली असून हा महाविकास आघाडीसाठी आणखी एक मोठा धक्का आहे.
नवीन सरकार आल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून पूर्वीच्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर २०१७ ला वॉर्ड रचना झाला होती. त्यानंतर जनगणना झालीच नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड रचना चुकीची आहे, अशी भूमिका भाजपने आधीच घेतली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जुन्या वॉर्ड रचनेसंदर्भातील चर्चा झाली.
मुंबई महापालिकेत २२७ वॉर्ड होते. मात्र ते वाढवून २३६ करण्यात आले होते. या व्यतिरिक्त पुण्यासह अनेक महापालिकांमध्ये वॉर्ड वाढवण्यात आले होते. त्यामुळे या सर्व निवडणुका २०१७ च्या वॉर्ड रचनेनुसार होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास आरक्षणात मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे आरक्षण सोडत नव्याने निघू शकतात. शिवाय निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल. कुठलीही जनगणना २०१७ नंतर झालेली नाही. २०२१ ला जनगणना अपेक्षित होती. मात्र कोरोना आल्यामुळेही जनगणनाही झाली नाही आणि त्याचमुळे आहेत तसंच वार्डचं गणित राहावं अशी भाजपची अपेक्षा होती.
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत वॉर्ड रचनेवरती प्रभाव पडणारे आणखी एक मोठा फॅक्टर आहेत, त्यातला एक फॅक्टर म्हणजे आरक्षण आहे, ठरणार आहे कारण अलीकडेच आरक्षणाची समीकरणे ही बदललेली आहेत. त्याचा विचार करूनही नवी वॉर्ड रचना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षणावरही अनेक मोठे निर्णय झालेले आहेत. त्यांचाही विचार आगामी काळात वॉर्ड रचना बदलताना करण्यात येईल.