(Indapur News) इंदापूर, (पुणे) : इंदापूर तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बेळवाडी येथील चंदन बाग जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
२० लाख रुपयांचे नुकसान…!
शहाजी धोंडीबा शिंदे या शेतकऱ्याच्या मालकीची असलेल्या बागेतील 20 झाडे जमीनदोस्त झाली आहेत. सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ते सांगत आहेत.
शेतपिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकूणच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वादळी वारे व पावसाने बागेचे नुकसान होऊन तसेच झाडांची पडझड झाली असून शासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही क्लिष्ट प्रक्रियेत न पाडता सरकारी मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करू लागले आहेत.
बेळवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहाजी शिंदे यांची सव्वा एकर चंदनाची शेती केली आहे. यामध्ये त्यांनी ३५२ चंदनाची झाडे लावली आहेत. साधारण दहा वर्षानंतर एक झाड हे कमीतकमी १ लाख ते सव्वा लाख रुपयांपर्यंत विकले जाते. परंतु झालेल्या अवकाळी पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बागेतील २० झाडे कोलमडून पडून त्याचे नुकसान झाले आहे. सदरची झाडे हि साडेपाच ते सहा वर्षाची झाहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून मदत मिळाली, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.