P.M Narendra Modi | पिंपरी, (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय महिला मंत्र्यांचे व्हिडिओ-फोटो मॉर्फ करत त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील सायबर पोलिसांनी एका तरुणाला रांची मधून ताब्यात घेतले आहे.
शमीम जावेद अन्सारी असे आरोपीचे नाव आहे.
तीन महिन्यांच्या तपासानंतर सायबर पोलिसांनी झारखंड राज्यातील रांची मधून त्याला अटक केली आहे. याबाबत राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड सायबर विभागाकडे तक्रार दिली होती. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
अनेक राजकीय नेत्यांचे फोटो, व्हिडिओ मॉर्फ केले असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस…
दरम्यान, तरुणाला आज पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आल्या नंतर कोर्टाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. या आरोपीने देशातील अनेक राजकीय नेत्यांचे फोटो, व्हिडिओ मॉर्फ केले असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
याबबत बोलताना सायबर सेलचे प्रमुख संजय तुंगार यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, जर अशा पद्धतीने कुणी फोटो व्हिडिओ मॉर्फ करत असेल तर त्यांच्या विरोधातही सायबर ॲक्ट नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Politics : उध्दव ठाकरे संतापले ! फडणवीसांना म्हणाले फडतूस; राजकारण तापले