राजेंद्रकुमार शेळके
(Pune )पुणे : उन्हाळ्याचा परिणाम दिसू लागला आहे. पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची धावपळ दिसून येतेय. पाण्याअभावी पक्षी दगावतात. प्रत्येकाने घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवावे. सोबत काही धान्य ठेवले तर उत्तमच. काही पक्षी समोर येण्यास घाबरतात, त्यामुळे झाडाच्या आड किंवा एखाद्या कोपऱ्यातही पाण्याची व्यवस्था करता येईल. तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे. असे मत उरसळ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन कोतवाल यांनी मांडले
शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उरसळ फार्मसी महाविद्यालयात विविध उपक्रम
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उरसळ फार्मसी महाविद्यालयात विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महाविद्यालयाने एक विशेष उपक्रम राबविला आहे. या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्यावेळी प्राचार्य सचिन कोतवाल यांनी वरील मत मांडले आहे.
पक्षी संवर्धन ही काळाची गरज हा उपक्रम संपूर्ण वर्षभरासाठी महाविद्यालयात राबवला जात आहे. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने महाविद्यालयाच्या प्राणांगणामध्ये पक्षांसाठी पाणी व खाद्य पुरवण्यासाठी झाडांमध्ये नारळाच्या झाडाचा वापर करून नारळाच्या वाटीमध्ये अतिशय सुंदर प्रकारे पाणी व धान्य ठेवता येईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. तसेच ते वेगवेगळ्या झाडांवरती ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातील पशुपक्ष्यांना त्याचा या कडक उन्हाळ्यामध्ये निश्चितच फायदा होणार आहे.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल यांनी एनएसएस अधिकारी प्रियंका बोरुडे व सर्व विद्यार्थ्यांचे विशेष असे आभार मानले. याप्रसंगी विभाग प्रमुख मनोज जोगराना, अश्विनी बनकर ,ज्योती दारकुंडे , वनिता म्हेत्रे, कांचन बुचडे, रागिणी पाटील ,जंगले मॅडम, जगदीश पठारे व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.