युनूस तांबोळी
Entertainment | शिरूर : चंदेरी नगरीचे स्वप्न आता ग्रामीण भागातील तरूणांना लागलेली आहेत. त्यामुळेच शार्टफिल्मच्या माद्यमातून वेगवेगळ्या विषयावर लिखाण करून चित्रीकरण केले जात आहे. त्यातून जनजागृती आणि युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ लागल्या आहेत. कलाकारांना अभीनयासाठी कलागुणांना वाव मिळू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शार्टफिल्मच्या माध्यमातून स्पर्धा सुरू झाली आहे.
जुन्या व नवीन चित्रपटाच्या माध्यमातून नवनवीन विषया बरोबर अभीनयासाठी नेहमीच स्पर्धा होत असलेली पहावयास मिळते. चित्रपटाच्या माध्यमातून समाजप्रबोधन होत असल्याने त्याचा प्रभाव देखील महत्वाचा मानला जातो.
सध्या नव युवकांमध्ये शार्टफिल्मच्या माध्यमातून अगदी कमी वेळात वेगवेगळ्या विषयाची मांडणी करण्याचे काम होऊ लागले आहे. ही शार्टफिल्म अगदी ३० मिनीटासाठी तयार केलेली असते. त्यामुळे या साठी सगळ्यांचा कस लागतो. एका आठवड्यात हे सर्व काम करून खर्चाला फाटा देण्याचे काम हे युवक करताना पहावयास मिळतात.
लेखक :
एखाद्या विषयावर लिखाण करून कमीत कमी वेळेत प्रेक्षकांना खिळवत ठेवण्याचे काम लेखक करत असतो. सुरेख विषय, मांडणी ला महत्व दिले जाते. लेखकाचा लिखाणाचा दर्जा देखील यासाठी महत्वाचा मानला जातो. विषयातून समाजप्रबोधन होणे हा मुळ हेतू लेखक साध्य करत असतो. त्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा हेतू साध्य होणे आवश्यक आहे. चूकीचा विषय देखील अनेक वेळा लेखकाला त्रासदायक ठरतो. त्यामुळे विषयाची निवड करताना लेखकाची तारेवरची कसरत असते.
गित :
शार्टफिल्म मध्ये गितांची मांडणी केलेली असते. त्यासाठी योग्य चाल व संगिताने प्रेक्षकांना रूजवावे यासाठी अगोदरच गित तयार करून घेतली जातात. त्यानंतर चित्रीकरणाच्या माध्यमातून गितावर चित्रीकरण करण्याचे काम करण्यात येते. गित लिहणारे अनेक असतात. मात्र विषयाला अनुसरून गिताची रचना करून ती प्रेक्षकांना आवडेल या पद्धतीने करणे महत्वाचे असते.
निवड आणि अभीनय :
विषयाला अनुरूप पात्रांची निवड देखील महत्वाची असते. साजेशे पात्र त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून सादर करण्यात येते. यासाठीअभिनेता व अभीनेत्रीचा निवड करण्याचे काम करण्यात येत असते.
चित्रीकरण :
योग्य ठिकाणाची निवड करून चित्रीकरणाचे काम केले जाते. यासाठी वेगवेगळ्या कॅमेरे वापरले जातात. यासाठी तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या युवकांना संधी मिळते. सध्या अशा प्रकारचे तंत्रज्ञान घेतलेले अनेक युवक या क्षेत्रात करीयर करताना पहावयास मिळत आहे.
निर्माता, दिग्दर्शक यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे काम हे सर्व सामुहिक पद्धतीने केले जाते. त्यातून ही शॅार्टफिल्म तयार होते. पुर्वी देखील कार्टूनच्या माध्यमातून शॅार्टफिल्म तयार केल्या जात असे. चित्रपट सादरीकरणा अगोदर त्या समाज प्रबोधनासाठी सिनेमागृहात दाखविल्या जात असत. या शॅार्टफिल्मची जागा जाहिरातींनी घेतल्या आहेत.
शिरूर व आंबेगाव तालुक्यात शॅार्टफिल्म तयार करण्याचे काम करण्यात येते. यासाठी विषयाची निवड करून सामुहिक पद्धतीने अशा शॅार्टफिल्म तयार करण्याचे काम करण्यात येते. किंकर, फिटमफाट, कोंढारा अशा प्रकारच्या तीन शॅार्टफिल्म तयार केल्या असून यापुढेही वेगवेगळ्या विषयावर शॅार्टफिल्म तयार करण्यात येणार आहे.
यातिल फिटमफाट ही अधिवासी व शाळाबाह्य मुलांवर आधारीत शॅार्टफिल्म तयार करण्यात आली आहे. शिक्षण प्रेमी नी यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. समाजप्रबोधनासाठी वेगवेगळ्या विषयावर अशा शॅार्टफिलम तयार करत आहोत. यातून नवयुवकांना रोजगाराची संधी मिळू शकेल. शासनाने अशा निवडलेल्या शॅार्टफिल्म सिनेमागृहात दाखवाव्यात.
दत्तात्रेय वाळूंज,लेखक व निर्माता,फिटमफाट शॅार्टफिल्म.
वेगवेगळ्या विषयावर चित्रीकरण करण्याचा छंद असल्याने या क्षेत्राकडे वळालो आहे. ती तयार करत असताना समाजप्रबोधन हा विषय घेऊनच समाजातील अंधारात असलेल्या कलागुंणाना वाव मिळवून देण्यासाठी काम करत आहे. शॅार्टफिल्मच्या माध्यमातून युवकांना संधी मिळवून अभिनयात करीयर करण्याची संधी मिळू शकते.
दिग्दर्शक,भरत रोडे.फिटमफाट शॅार्टफिल्म
शॅार्टफिल्मच्या माध्यमातून अभीनय करण्या साठी वाव मिळू लागला आहे. अभिनयाची आवड असल्याने वेगवेगळ्या शॅार्टफिल्म मध्ये काम करतो. फिटमफाट च्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे यापुढेही अशा वेगळ्या विषयावर अभिनय करणार आहे.
सचिन शिंदे,अभिनेता,फिटमफाट शॅार्टफिल्म.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur : ‘विचार तुमचे लिखाण आमचे; कडक उन्हाळा पशुपक्षांना संभाळा ; सागर गायकवाड
Shirur News : हरवलेल्या बछड्यांना पुन्हा मातेकडे पोहचविले ; वन विभागाची कामगिरी