राजेंद्रकमार शेळके
Shirur Crime पुणे : Shirur Crime – रांजणगाव (ता. शिरूर) येथील वॉल्टर पॅक या कंपनीतील ७ लाखाच्या साहित्याची चोरी करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला रांजणगाव (Shirur Crime) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. (Shirur Crime) त्यांच्याकडून तब्बल १७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
राजेश फगु चौधरी (वय ३० वर्षे रा सनं २७ श्री कंट्रोल चौक धायरी रोड नर्हे पुणे) सुरेश विजय बाहदुर चौरसिया (वय २७), संदिप कुमार राधेशाम चौरसिया (वय २२) रविंद्र कुमार घनशाम चौरसिया (वय २०, तिघेही मूळ रा. ग्राम परसोईया तिवारी सिद्धार्थ नगर पोस्ट ममापुर थाना तिलोकपूर तहसिल ईटवा युपी, सध्या रा. फंडवस्ती रांजणगाव ता. शिरुर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकारणी जयराज करनन (फ्लॅट नं सी-1/603 जेकेजी पुर्वरंग सोसायटी वाघोली ता. हवेली जि. पुणे मुळ उत्तमनथापुरम अनुकुलम मेतुर जि. मधुराई राज्य तामिळनाडू) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयराज करनन यांच्या वॉल्टर पॅक कंपनीतील ७ लाख २८ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या मापाचे ८५ फॉर्मिंग टुल, इलेक्ट्रिकल केबल, वेल्डिंग मशिन व पॅनल हे चोरून नेल्याची धक्कादायक घटना २९ मार्चला मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी फिर्यादी जयराज करनन यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी परिसरातिल सीसीटिव्ही फुटेजची पहाणी केली असता, सदरचा गुन्हा वरील चार आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी वरील चारही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व चोरी करताना वापरलेले वाहन असा एकूण १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास करीत आहेत
सदरची कामगिरी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बलवंत गांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गुलाब येळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, विलास आंबेकर यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur Crime : गोरक्ष दलाने कत्तलखान्यात जाणाऱ्या तब्बल 100 म्हशी व रेडकुंचे वाचवले प्राण….!
Shirur Crime : ऐन यात्रेच्या दिवशी पुण्यातील एका माजी उपसरपंचाला अटक ; काय प्रकरण ते जाणून घ्या…!
Shirur Crime : किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…!