दीपक खिलारे
(Indapur News )इंदापूर : वाढदिवस म्हटलं की, डोळ्यासमोर उभे राहतो तो केक पार्टी, धांगडधिंगा व जेवणावळी परंतु इंदापूर शहरातील कै. पांडुरंग रामचंद्र खिलारे रुग्णवाहिकीचे प्रमुख नितीनमामा खिलारे यांनी कन्या वैष्णवी (जानू) वय-,८ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांना फ्रुट शॅडल, ब्रश आणि टूथपेस्ट आदी वस्तूंचे वाटप करुन आरोग्याचा संदेश दिला.
नितीन खिलारे हे रुग्णवाहिका चालक असून अपघाताग्रस्तांच्या मदतीला धावणारा ‘मामा’ म्हणून ते सर्व परिचित आहेत. त्यांच्या ८ वर्षांच्या कन्येचा वैष्णवी खिलारे जानू चा वाढदिवस साजरा झाला. मात्र जानूच्या वाढदिवसाची चर्चा आता सर्वत्र रंगली. ज्यावेळी जानूचा वाढदिवस साजरा होत होता. त्यावेळी नितीनमामा आपली रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत होते. त्यामुळे ८ वर्षाच्या जानूला आपल्या सेलिब्रेशनला पप्पा उपस्थित नाहीत त्याची कमी जरी जाणवत असली तरी आपले पप्पा यावेळी जे कर्तव्य बजावत आहेत याचा तिला अभिमान तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.
आरोग्य जपा, नियमित दात घासा…!
गुरुकुल विद्यामंदिर गोखळी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस, वकील, डॉक्टर आदींच्या हस्ते फ्रुट शॅडल, ब्रश आणि टूथपेस्ट ह्या वस्तू भेट देण्यात आल्या. यातून चॉकलेट फास्ट फूड पासून दूर राहा, आरोग्य जपा, नियमित दात घासा आणि ज्यांच्या हस्ते तुम्हाला हे गिफ्ट दिले त्यांच्यासारखे हुशार कर्तबगार व्हा असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
अशा पद्धतीने साजरा होणारा हा तालुक्यातील पहिलाच वाढदिवस आहे. ना केक, ना चॉकलेट, ना कोणती आतिषबाजी. अत्यंत साध्या, अनोख्या पद्धतीने खिलारे कुटुंबीयांनी केलेल्या या वाढदिवसाची चर्चा तालुकाभर रंगली आहे.
दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, ॲड. अंजली दास, ॲड.ज्योती जगताप, मनीषा पाटील यांनी वैष्णवीला वाढदिवसानिमित्त उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सैनिक महादेव सोमवंशी, ॲड. निमल सुमित्रा देवकाते, डॉ. रियाज पठाण, डॉ.परविण पठाण, पोलीस हवालदार माधुरी लडकत, भास्कर रासकर, गुरुकुल गोखळी संस्थेचे संस्थापक भरत हरणावळ, मुख्याध्यापक विश्वास हुलगे, सहशिक्षक सुरेश वरकड, सुखशाला रुपनवर, शोभा जवळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत हरणावळ यांनी केले. तसेच सूत्रसंचालन नामदेव तरंगे यांनी केले. तर आभार ज्योती खिलारे यांनी मानले.